Rohit Sharma : रोहित शर्माला वर्ल्ड कपपूर्वी ब्रेकची गरज, मायकल क्लार्कनं कारण सांगितलं अन् पुढे म्हणाला हिटमॅनला एक काम करावं लागेल...

New Delhi  : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं  आयोजन करण्यात आलं असून 1 जून ते 30 जून दरम्यान क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना चार गटात विभागण्यत आलं आहे. भारताचा संघ अ गटात असून त्यासोबत पाकिस्तान देखील आहे. बीसीसीआयनं  काही दिवसांपूर्वी टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. रोहित शर्माकडे  संघाचं नेतृत्त्व देण्यात आलं आहे. रोहित सोबत विराट कोहलीला देखील संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या आयपीएलमधील कामगिरीचा आढावा घेत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूनं मोठं वक्तव्य केलंय. रोहित शर्माला ब्रेकची गरज असल्याचं मायकल क्लार्कनं म्हटलं आहे. क्लार्कनं यासाठी काही कारणं देखील सांगितली आहेत.  

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं रोहित शर्मा थकलेला वाटत असल्याचं म्हटलंय. रोहित शर्माला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी ब्रेकची गरज आहे. ब्रेक घेतल्यास तो टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यापूर्वी पूर्ण ताकदीनं उतरेल, असं मायकल क्लार्कनं म्हटलं.

Sanju Samson : संजू नाबाद होता, होपचा पाय दोनदा बाऊंड्रीला लागलेला, सॅमसनच्या विकेटवर नवजोत सिंह सिद्धूचा मोठा गौप्यस्फोट

रोहित शर्मा टीम इंडियाचं आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये नेतृत्त्व करणार आहे. आयपीएलच्या कामगिरीचा विचार केला असता मुंबई इंडियन्सच्या गेल्या पाच मॅचेसचा विचार केला असता रोहित शर्मा त्यामध्ये चारवेळा 10 चा टप्पा देखील पर करु शकलेला नाही. 

रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी मालिकेनंतर आयपीएलमध्ये सहभागी झाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा देखील आयपीएलमधील प्ले ऑफच्या शर्यतीतील प्रवास जवळपास संपुष्टात आलाय. रोहित शर्मानं त्याच्या कामगिरीचं मूल्यमापन केल्यास त्याला कळेल की चांगल्या सुरुवातीनंतर त्याची कामगिरी निराशाजनक ठरली, असं मायकल क्लार्क म्हणाला. 

रोहितला ब्रेक मिळणार नाही...

मायकल क्लार्क पुढे म्हणाला की मला असं वाटतं की रोहित शर्मला थोड्या प्रमाणात थकवा जाणवत असेल. मायकल क्लार्क स्टार स्पोर्टसशी बोलत होता. 

रोहित शर्मानं ब्रेक घेतल्यास त्यासाठी ते महत्त्वाचं ठरेल. मात्र, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे.रोहितला ब्रेक मिळणार नाही. त्यामुळं रोहित शर्माला फॉर्ममध्येच परतावं लागणार आहे, असं मायकल क्लार्क म्हणाला.  

दरम्यान, आयपीएलच्या प्ले ऑफमधील मुंबई इंडियन्सच्या प्रवेशाची शक्यता जवळपास संपल्यात जमा आहे. मुंबई  गुणतालिकेत सध्या नवव्या स्थानावर आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply