New Delhi : NASA आणि ISRO मिळून बनवित आहेत NISAR उपग्रह, जगाचा असा होणार फायदा

New Delhi :  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ( इस्रो  ) चंद्रयान-3 ही अंतराळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारताने नुकतेच सुर्ययान आदित्य एल-1 आणि गगनयान मोहिमेची टेस्ट फ्लाईट या मोहीमा केल्या आहेत. आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आणि भारताची इस्रो यांनी एकत्र आले आहेत. त्यानूसार नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार ( एनआयएसएआर ) म्हणजेच निसार उपग्रह अंतराळात पाठविण्यात येणार आहे. या उपग्रहाचा वापर पृथ्वीच्या अभ्यासासाठी केला जाणार आहे. हा उपग्रह पृथ्वीवरील वनक्षेत्र आणि वेट लॅंड ईको – सिस्टीम आणि त्याचा प्रभाव यांचा अभ्यास करण्यात क्रांती आणणार आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग आणि पर्यावरणाचा अभ्यास करता येणार आहे.

निसार नावाच्या उपग्रहास साल 2024 च्या सुरुवातीला अंतराळात सोडण्याचे लक्ष्य आहे. निसार उपग्रहामुळे आपल्या पृथ्वीवरील वनक्षेत्रे तसचे तिवरांच्या खाजण जमिनींच्या क्षेत्राती संपूर्ण महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे. जागतिक तापमान वाढीस जबाबदार असलेल्या घटक ग्रीन हाऊस गॅसेस यांच्या नैसर्गिक रेग्यूलेशनमधील महत्वाची माहीती हा उपग्रह देणार आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने ( जेपीएल ) देखील आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

दर 12 दिवसांनी पृथ्वीला स्कॅन करणार

निसार उपग्रह कक्षेत प्रवेश केल्यानंतर त्यांचा प्रगत रडार सिस्टीममुळे दर 12 दिवसांनी पृथ्वीवरील सर्व जमिन आणि बर्फाळ प्रदेशाचे व्यापक स्कॅनिंग होणार आहे. त्याने जमा केलेला डाटा पर्यावरण अभ्यासकांना फायद्याचा ठरणार आहे. कार्बनचे उत्सर्जन आणि शोषण याची माहीती मिळणार आहे. जंगलातील झाडे आपल्या लाकडा कार्बन जमा करुन ठेवतात. तर वेटलॅंड आपल्या जैविक मातीच्या थरात कार्बनचे संरक्षित करते. या प्रणालीत कोणतीही बाधा क्रमिक किंवा अचानक आल्यास वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन सोडण्याचा वेगा वाढ होऊ शकते.

कार्बन चक्राची मिळणार महत्वाची माहीती

जागतिक पातळीवर जमिनीतील झालेल्या बदलाचा अभ्यास केल्यास कार्बनचक्र आणि त्याचा प्रभाव याचा अभ्यास करण्यास खूपच मदत मिळणार आहे. वातावरण, जमिन, समुद्र आणि सजिवांमध्ये कार्बन गती नियंत्रित करण्यात कार्बनचक्र महत्वाची भूमिका बजावते. दक्षिण कॅलिफोर्नियातील नासाच्या जेपीएलमध्ये निसार परियोजनेवर काम करणारे संशोधक पॉल रोसेन यांनी सांगितले की निसारवरील रडार तंत्रज्ञान आपल्याला अंतराळ आणि वेळ या दोन्ही संदर्भात आपल्या पृथ्वीचा अधिक तौलनिक अभ्यास करण्यास मदत करणार आहे. पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाची विकसित स्थितीची तंतोतंत माहीती मिळणार आहे. नासा आणि इस्रोने मिळून अर्थ – ऑब्जरवेशन मिशन अंतर्गत हार्डवेअरच्या विकासात मदत करणाऱ्या दोन संस्थांमधील सहकार्याने हा निसार उपग्रह तयार झाला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply