Nepal Bus Accident : नेपाळ अपघातात महाराष्ट्रातील २५ जणांचा मृत्यू, वायुसेनेचं विमान मृतदेह घेऊन जळगावकडे रवाना; PM मोदींकडून मोठी मदत जाहीर

Nepal Bus Accident : नेपाळमध्ये शुक्रवारी भीषण अपघात घडला होता. महाराष्ट्रातील प्रवाशांची बस नदीत कोसळली होती. यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचे मृतदेह घेऊन वायुसेनेचं विमान आज नेपाळवरून निघालं आहे. 25 नागरिकांचे मृतदेह घेऊन विशेष विमान जळगावकडे निघालं आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे विमान पोहोचणार आहे.

नेपाळमधील तनाहुन जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत केली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट करून याची माहिती दिली आहे.

Pune Accident : पुण्यात एसटी बस- कारची समोरासमोर धडक, एका महिलेचा मृत्यू; ६ जण गंभीर

 नेपाळमध्ये शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रवाशांची बस मर्सियांगडी नदीत कोसळली होती. तनहुन जिल्ह्यातील आयना डोंगराजवळ ही घटना घडली होती. याबसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. बस कोसळल्यानंतर सशस्त्र पोलीस दलाने मदत कार्य सुरु केलं होतं. गोरखपूरहून प्रवासी नेपाळच्या दिशेने निघाले होते. ही बस पोखरातून काठमांडूला निघाली होती.

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला होता. या अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने उद्या शनिवारी २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यात येणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply