Neet Exam Issue : नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; पटनानंतर रांची कनेक्शन समोर, RIMS चा विद्यार्थी ताब्यात

Neet Exam Issue : नीट पेपर लीक प्रकरणात मोठं अपडेट समोर आलंय. याप्रकरणी सीबीआयने झारखंडच्या रांचीमधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. आतापर्यंत या प्रकरणी सीबीआयने काही लोकांना अटक केलीय. मात्र पहिल्यांदाच विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात येत आहे. एमबीबीएस २०२३ चा हा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आलीय. आता याप्रकरणामध्ये अजून काही विद्यार्थी सहभागी आहेत का? याचा देखील तपास सुरू आहे.

नीट युजी पेपर लीक प्रकरणी सीबीआयने रांची RIMS च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला अटक केलीय. सीबीआयने या विद्यार्थ्याचा संबंध सॉल्व्हर गँगशी असल्याचा आरोप करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. सीबीआयने या विद्यार्थ्याचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि फोन जप्त केलेत. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने ही कारवाई केल्याचं सांगितलं जातंय.

Bangladesh Protest : बांगलादेशमध्ये आरक्षणावरून हिंसाचार; आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू, २५०० जखमी, रस्त्यावर सैनिकांचा मोठा फौजफाटा

पेपर लीक प्रकरणात रॉकी हा आतापर्यंतची सर्वात मोठी कडी असल्याचं सिद्ध झालंय. रॉकीनेच सीबीआयसमोर एमबीबीएस विद्यार्थ्यांनी पेपर सोडवल्याचा मोठा खुलासा केला होता. त्यानंतर पाटणा एम्सच्या चार वैद्यकीय विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. आता सीबीआयने रांची रिम्सच्या वैद्यकीय विद्यार्थ्यालाही ताब्यात घेतलंय.

सुरेंद्र नावाच्या व्यक्तीने रॉकीसाठी सॉल्व्हर्सची व्यवस्था करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीबीआयने सुरेंद्रलाही अटक केलीय. त्यासोबतच चार वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेतलंय. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने पाटणा एम्सच्या चार विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत सोडवण्यासाठी काही प्रश्न दिले होते, ते त्यांनी सोडवले. प्राथमिक चौकशीनंतरच त्यांनी याप्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचं कबूल केलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply