NEET Exam : NEET वरून सुप्रीम कोर्टाचा यू-टर्न; 1563 विद्यार्थ्यांचीही होणार फेरपरीक्षा

NEET Exam : नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या आऱोपानंतर आता फेरपरीक्षा घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. मात्र ज्या 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले, त्यांनाही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टानंच ग्रेस मार्क्स देण्याचा निर्णय दिला होता. आता तोच निर्णय कोर्टानं बदललाय. त्यामुळे ग्रेस् मार्क्स विद्यार्थ्यांना महागात पडले आहेत. यात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणा-यांचाही समावेश आहे. यावरचाच हा रिपोर्ट....

नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या आऱोपावरून वादंग निर्माण झालं होतं. सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद झाला. यानंतर सुप्रीम कोर्टाने आपल्याच आधीच्या निर्णयावरून यु-टर्न घेत ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याला हिरवा झेंडा दाखवलाय.तर ही फेरपरीक्षा 23 जून रोजी होणार असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलंय..

Ajit Pawar : 'अजितदादांना घेऊन बँड व्हॅल्यू कमी....', RSSमध्ये त्या लेखावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

1) ग्रेस मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना 23 जून रोजी फेरपरीक्षा किंवा समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत.

2) 1563 विद्यार्थ्यांचीच पेरपरीक्षा होणार त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार नाही.

3) 23 जूनला होणाऱ्या परीक्षेचा निकाल 30 जूनला लागणार असल्याने जुलैमध्ये समुपदेशनाला सुरुवात होईल.

4) 10-20 नव्हे तर तब्बल 100-150 मार्क्स ग्रेस म्हणून दिल्यामुळे 1563 विद्यार्थ्यांपैकी 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले. त्यामुळे मेरिटच्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आधी जाहीर केलेला ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करत सुप्रीम कोर्टाने फेरपरीक्षा जाहीर केलीय. पण सातत्याने परीक्षांमध्ये होत असलेल्या गोंधळ आणि घोटाळ्याचा आरोप दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे 23 जूनला जाहीर झालेली नीटची फेरपरीक्षा तरी नीट होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply