NCP Merger | दिल्लीमध्ये काय शिजतंय? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. राज्याच्या राजकारणात या विलिनीकरणावरून सतत चर्चा सुरू असून, याबाबत स्पष्टता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आज दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत केवळ विलीनीकरणाचाच नव्हे, तर राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बाबत चर्चा झाली आहे. याच बैठकीदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केल्याचेही समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या संदर्भात भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी नेमकी कोणती चर्चा झाली, कोणते मुद्दे मांडण्यात आले आणि पुढील रणनीती काय असणार, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या चर्चेनंतर विलीनीकरणाबाबत काही ठोस निर्णय घेतला जाणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *