NCP Meger | विलीनीकरणानंतर शरद पवार राजकारणापासून होणार होते दूर, नेमकं काय घडणार होतं?

पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून काही प्रमाणात अलिप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विलीनीकरणानंतर ते सक्रिय राजकारणापेक्षा सामाजिक कामांमध्ये अधिक लक्ष घालणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे, असा आग्रह अजित पवार यांनी धरला होता. विलीनीकरणानंतर पक्षाची प्रमुख जबाबदारी अजित पवारांकडे सोपवली जाणार होती दरम्यान, शरद पवार यांची राज्यसभेची मुदत एप्रिल महिन्यात संपत असून त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील आगामी नेतृत्व आणि रणनीतीबाबत चर्चांना वेग आले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *