
NCP Maharashtra Political News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. ईडीच्या रडावर असलेल्या काही नेत्यांना भाजप गळाला लावणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. यासाठी भाजपच्या गोटात जोरदार हालचालींना सुद्धा सुरूवात झाली असल्याची माहिती आहे.
विशेष बाब म्हणजे, या नेत्यांमध्ये अजित पवार यांचा समावेश नसून हा राष्ट्रवादीचा दुसरा गट असल्याची माहिती आहे. या गटामधील ज्येष्ठ नेत्यांची एक मोठी फळी भाजपसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये बहुतांश नेते हे ईडीच्या रडावरील असल्याची माहिती आहे. या नेत्यांकडून भाजपला ग्रीन सिग्नल सुद्धा दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
यामध्ये मंत्रिपदे भोगलेल्या अनेक वरिष्ठ राष्ट्रवादी चा नेत्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार होणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींमुळे राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार नाराज असल्याचा चर्चांना देखील उधाण आला होत. यातच आता राष्ट्रवादीचे थेट १० नेते भाजपच्या वाटेवर आहेत. यातील बहुतांश नेते हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे.
अजित पवारांनी दिला वेगवेगळ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम
गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अजित पवार हे लवकरच भाजपसोबत जाणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आज या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. कारण, अजित पवार यांनी आपला सासवड दौरा तातडीने रद्द केला होता. मात्र, अजित पवार यांनी वेगवेगळ्या राजकीय चर्चांना ट्विट करत पूर्णविराम दिलाय.
"मी खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे", असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
शहर
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
महाराष्ट्र
- पालघर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा 'ब्रेकथ्रू'तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम पूर्ण; कामाला वेग!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य
























Subscribe to my channel




