NCP | अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज पहिली कॅबिनेट बैठक पार पडली असून, या बैठकीत अजित पवार यांनी हयातीत मांडलेल्या आणि पाठपुरावा केलेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विकासात्मक दृष्टीकोनाला आजच्या बैठकीत मान देण्यात आल्याचे चित्र दिसले.

या कॅबिनेट बैठकीत बारामतीमध्ये भव्य आणि अत्याधुनिक क्रीडासंकुल उभारण्यासाठी तब्बल 75 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. हा निर्णय बारामती आणि परिसरातील युवकांसाठी मोठा दिलासा देणारा मानला जात आहे. यासोबतच इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर–रत्नापूर परिसरात सुमारे एक हजार एकर जागेवर नवीन एमआयडीसी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही एमआयडीसी अजित पवार यांची एक महत्त्वाकांक्षी इच्छा होती. त्याचबरोबर राज्यात अतिरिक्त जिल्ह्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील कॅबिनेट बैठकीत अजित पवार यांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि त्यानंतर त्यांनी यासंदर्भात सातत्याने महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *