NCB Raids : मुंबईसह दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई; १५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त, दोघांच्या मुसक्या आवळल्या

NCB Raids : अंमली पदार्थांप्रकरणी एनसीबीचं धाड सत्र सुरूच आहे. आजही मुंबई आणि दिल्ली येथून एनसीबीने १५ कोटी रुपयांचे २ किलो कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी झांबियन नागरीकासह एका टांझानियन महिलेला अटक करण्यात आलीये.

दिवाळी सणात नागरिकांचे जीवन उद्धवस्त करण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी टोळ्यांचा हा डाव एनसीबीने हाणून पाडला आहे. अंमली पदार्थांची तस्करी करत असलेला झांबियन नागरिक गिलमोरबाबत एनसीबी अधिकांऱ्यांना टीप मिळाली होती.

Buldhana News : बुलढाण्यात बर्निंग ट्रकचा थरार! रस्त्यावर धावत्या वाहनाने घेतला अचानक पेट

त्यानंतर सापळा रचून त्याच्यावर लक्ष ठेवले असताना तो आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी करणाऱ्या टोळीशी संबधीत असल्याचं एनसीबीने अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. अंमली पदार्थ एका व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी गिलमोर एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथेच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह एमआर ऑगस्टिनो नावाच्या महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि गोव्यात हे दोघे कार्यरत होते.

झांबियाचा रहिवासी असलेला गिलमोर अद्दिस अबाबा येथून भारतात आला होता. पुढील चौकशीसाठी दोघांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

सणासुदीच्या काळात कोकेन आणि विविध ड्रग्जची पार्टी करण्याचे प्रमाण तरुण तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करी रॅकेटला वेळीच फटका बसल्याने अनेकांचे आयुष्य धोक्यात जाण्यापासून वाचले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply