Nawab Malik : विधान परिषदेत नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; फडणवीस म्हणाले,"आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी..."

Nawab Malik ; विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवशनला हजेरी लावली. इतकेच नाही तर सभागृहात ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत सत्ताधारी बाकांवर जाऊन बसलेय यावरून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दानवे यांच्या आक्षेपानंतर फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष जेलमध्ये असताना देखील (नवाब मलिक) आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडत आहेत.

आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत. मी आणि मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढलं नाही. याचं उत्तर आधी द्या मग आम्हाला सवाल विचारा अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं . यादरम्यान सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळालं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *