Navi Mumbai Fire : हृदयद्रावक घटना! किराणा दुकानात सिलेंडरचा स्फोट, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Navi Mumbai Fire : राज्यात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात, रोषणाई आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये साजरा केला जात आहे. राज्यभरात आनंदोत्सव असतानाच नवी मुंबईत मात्र हृदयद्रावक घटना घडली. नवी मुंबईतील उलवे येथील जावळे गावात किराणा दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाची तीव्रता अतिशय भयंकर होती, त्यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने रुग्णालयात दम तोडला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उलवे येथील जावळे गावात किराणा मालाच्या दुकानात अवैधरित्या पेट्रोल विक्री करण्यात येत होती. तसेच तिथे लहान सिलेंडरची देखील विक्री करण्यात येत होती. दुकानात स्फोटक साहित्य असताना सायंकाळी पणती पेटविताना पेट्रोलला आग लागून स्फोट झाला.

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश


मिळालेल्या माहितीनुसार, साधारण 3 ते 4 लहान सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्यांमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश आहे. त्यात 38 वर्षीय महिला, एक 15 वर्षांची मुलगी असून एक 8 वर्षांचा मुलगा आहे. एकूणच या दुर्घटनेमुळे उलवे विभागात अवैधरित्या होणाऱ्या पेट्रोल विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला असून या दुर्घटनेनंतर तरी पोलीस प्रशासनाला जागं येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply