Navi Mumbai Accident : दिवाळीत 'ड्रंक अँड ड्राइव्ह, नवी मुंबईत मद्यपी चालकाने ३ जणांना उडवले, व्हिडीओ व्हायरल

Navi Mumbai : राज्यात दिवाळीचा सण उत्साहात सुरू आहे. दिव्याच्या रोषणाईने शहर सजली आहेत. लाइट्स आणि दिव्यांनी नवी मुंबईही तेजोमय प्रकाशात उजळून निघाली आहे. पण याच आनंदात विरजण पडलेय. नवी मुंबईमध्ये मध्यरात्री एका मद्यपी चालकाने भरधाव वेगाने तीन जणांना उडवलेय. सानपाडामध्ये हा प्रकार घडलाय. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सानपाडा यथे रात्री उशिरा ड्रंक अँड ड्राइव्हचे प्रकरण समोर आले आहे. एका चार चाकी वाहनाने रस्त्यावर बोलत उभे असलेल्या 3 जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सानपाडा विभागातील अंतर्गत रस्त्यावर ही दुर्घटना घडली असून यामध्ये 3 जण जखमी झाले आहेत. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या या व्यक्तीला गर्दीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे समजतेय. उपस्थित नागरिकांनी सदर वाहनचालकाला सानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Navi Mumbai Fire : हृदयद्रावक घटना! किराणा दुकानात सिलेंडरचा स्फोट, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सानपाड्याच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आलाय. रस्त्याच्या बाजूला काही लोक बोलत उभे होते. तीन जणांचा एक ग्रुप चर्चा करत उभा होता. त्याचवेळी अचानक भरधाव वेगाने आलेल्या एका चार चाकी वाहनाने त्या तिघांना उडवले. त्यानंतर त्या चालकाने कारसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण उपस्थित जमावाने त्या गाडीला अडवले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई कर चालकाला अटक केली असून पुढील कारवाई सुरु कऱण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply