Navi Mumbai : नवी मुंबईच्या खारघरमध्ये मोठा राडा; माथाडी कामगारांकडून मनसे कार्यकर्त्यांना मारहाण

Navi Mumbai : नवी मुंबईच्या खारघरमधील एका रुग्णालयासमोर मोठा राडा झाल्याचं वृत्त हाती आहे. नवी मुंबईत कामगार नेते महेश जाधव यांच्या समर्थक माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या परिसरातच माथाडी कामगारांनी मनसे कार्यर्त्यांना ही मारहाण केली आहे. मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर मारहाणीचा आरोप करणारे माथाडी कामगार महेश जाधव हे सध्या नवी मुंबईतील रुग्णालयात आहेत. महेश जाधव दाखल असलेल्या रुग्णालयात मनसे कार्यकर्ते येत होते. त्याचवेळी माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली.

ST Employee Salary : पगार कधी मिळणार? राज्य सरकारच्या दिरंगाईने एसटी कर्मचाऱ्यांवर 'संक्रांत' येण्याची वेळ

माथाडी कामगारांनी मारहाण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. तर काही मनसे कार्यकर्ते इमारतीत लपायला गेले. मात्र, त्यानंतर माथाडी कामगारांनी इमारतीत जाऊन सुरक्षा रक्षकाच्या खोलीच्या काचा बाहेर काढला. तर काही मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेरूनच पळ काढळा.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply