Nashik Politics : ठाकरे गटाची ताकद वाढली; पक्षप्रवेश करताच संदिप गुळवे यांना मिळाली नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी

Nashik Politics : राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर सर्व राजकीय पक्षाने मोर्चा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे वळवला आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. याचदरम्यान ठाकरे गटाने नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाने शिक्षक मतदारसंघातून संदिप गुळवे यांनी उमेदवारी दिली आहे. गुळवे यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश करताच त्यांना उमेदवारी मिळाली.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे. आज शनिवारी ठाकरे गटाने नाशिक शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला. ठाकरे गटाने या मतदारसंघातून संदिप गुळवे यांना उमेदवारी दिली. संजय राऊतांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी मिळाली.

Latur Crime : धक्कादायक! १५ जणांच्या टोळीकडून हातपाय बांधून बेदम मारहाण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

महायुतीकडून कोणाला उमेदवारी?

 दुसरीकडे महायुतीकडून या मतदारसंघातून किशोर दराडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महायुती आधीच ठाकरे गटाने नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढाई मिळेल का, हे पुढील काही स्पष्ट होईल.

ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर संदिप गुळवे म्हणाले, 'मी काँग्रेस पक्षातून तयारी केली होती. मात्र बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, ही जागा ठाकरे गटाला सुटली तरी आमचे उमेदवार हे संदीप गुळवे असतील. त्यानुसार ठाकरे गटाला नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा सुटली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली, त्यानंतर मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

'मला किशोर दराडे यांचं आव्हान वाटत नाही. कारण सहा वर्षात त्यांचं जर कामकाज बघितलं, संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या कामाविषयी नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी 100% विजयी होईल, असा विश्वास आहे',असे ते म्हणाले.

कोण आहेत संदिप गुळवे?

संदिप गुळवे हे नाशिकमधील शिक्षण, सहकार व राजकिय क्षेत्रातील आघाडीवरील नेते आहेत. अॅड. संदिप गुळवे हे नाशिक जिल्हा परिषदेचे २०१२ ते २०१७ पर्यंत सदस्य होते. गुळवे हे मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक आहेत.

नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. त्याचबरोबर ते नाशिक जिल्ह्यातील विविध सहकारी, शिक्षण व कृषी संघटनांशी निगडीत आहेत. आज मुंबईतील शिवसेना भवनात झालेल्या पक्षप्रवेश प्रसंगी संजय राऊत, सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनंत गीते, अरविंद सावंत आणि इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

 
 


 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply