Nashik Politics : छगन भुजबळांना नाशिकमधून लोकसभा उमेदवारी जवळपास निश्चित; पुढील ४८ तासात निर्णय होणार

 

Nashik Politics : लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेने शिंदे गट आणि भाजपच्या सुरु असलेल्या संघर्षादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही या जागेवर दावा केला आहे. छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहेत.

छगन भुजबळ यांची नाशिकमधून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भुजबळ नाशिकमधून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत.

Maharashtra Politics : काँग्रेसला धक्का! लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने माजी आमदाराचा पक्षाला रामराम

भाजपने कमळ चिन्हावर छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली. पण अजित पवार यांनी भुजबळांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी ही भूमिका घेतलीय. याबाबत पुढील ४८ तासात निर्णय होणार आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

सध्या सुरु असलेल्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी म्हटलं की, माझं नाव तर तुम्हीच चर्चेत आणले आहे. महायुतीत नाशिकच्या जागेवर अजून चर्चा सुरू आहे. बऱ्याच जागेवर एकमत झाले आहे. नाशिकच्या जागेसाठी अनेकजण मुंबईला जाऊन आलेत. मात्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहेत.

चर्चेनंतर जो कुणी उमेदवार ठरेल त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्,या असे मी सांगितले नाही. फक्त शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या, अशी मागणी केली असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

कार्यकर्त्यांकडून टीझर रिलीज

नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत कार्यकर्त्यांकडून मिळत आहेत. कार्यकर्त्यांनी छगन भुजबळांचा तसा टीझर रिलीज केला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असताना छगन भुजबळांचा टीझर समोर आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे येथून पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छूक आहे. यासाठी त्यांनी शक्तीप्रदर्शन करत नाशिकाहून गाड्यांच्या ताफा घेऊन मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट देखील घेतली. मात्र हेमंत गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनही मुंबई गाठत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे नाशिकाच्या जागेवरुन सुरु असलेल्या चढाओढीत कोण बाजी मारणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply