Nashik News : कोयता, कुऱ्हाड अन् रक्ताच्या थारोळ्या; भावकीच्या वादातून दोन गटात राडा, एकाचा मृत्यू, १३ जण जखमी

Nashik News : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. कोयते, कुऱ्हाडी या धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

नाशिकच्या सिल्लोड तालुक्यातील दातली या गावात शुक्रवारी दोन गटात तुफान राडा झाला होता. दोन्ही गटाने एकमेकांवर हल्ला करण्यासाठी कोयता आणि कुऱ्हाडी या धारदार शस्त्रांनी वापर केला होता. या हल्ल्यात सागर मारूती भाबड याला सुरूवातील गाडीनं चिरडलं नंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. यात सागरचा जागीच मृत्यू झाला.

Beed : एसटी चालकाचा लेक झाला सरकारी अधिकारी! MPSC त झेंडा रोवला, अख्ख्या बीडमध्ये होतेय कौतुक

तर, अन्य १३ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ६ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर पंचनामा करत त्यांनी तातडीने जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे. हे हत्याकांड भाउबंदकीच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. पण कोयता आणि कुऱ्हाडीचा वापर करत झालेल्या रक्तरंजित हल्ल्यामुळे दातली गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply