Nashik : ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणेंच्या गाडीवर हल्ला, मोठा दगड टाकून काच फोडली

Nashik : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभे असलेल्या गाडीवर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर हल्ला केला. यावेळी मोठ्या दगडाने त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली.

Pune : ‘टोइंग’च्या सरसकट भुर्दंडातून सुटका, कारवाईच्यावेळी वाहनचालक उपस्थित असल्यास केवळ ‘नो-पार्किंग’चा दंड

याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी देखील बाळा कोकणे यांच्यावर असाच जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यांची गाडी फोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply