Nashik Malegaon News : ठाकरेंना मोठा धक्का; दादा भुसेंचे कट्टर विरोधक असलेल्या अद्वय हिरेंना अटक; प्रकरण नेमकं काय?

Nashik Malegaon News: रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरिता बनावट दस्तऐवज तयार करून जिल्हा बँकेची 7 कोटी 46 लाख रुपयांचं कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं भोपाळ येथून अद्वय हिरे यांना ताब्यात घेतलं आहे. बुधवारी (दिनांक 15) रात्री उशिरा मालेगावच्या रमजानपूरा पोलिसांत चौकशीसाठी आणलं. रमजानपुरा पोलिसांत अटक नोंद केल्यानंतर हिरे यांना नाशिक येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आलं. 

दरम्यान, हिरे यांना नाशिक येथे नेत असताना हिरे समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस वाहनाला गराडा घातला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या विरूद्धही घोषणाबाजी करण्यात आली. आज मालेगाव येथील न्यायालयात अद्वय हिरे यांना हजर केलं जाणार आहे. मंत्री दादा भुसे यांनी यावेळी काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणी अद्वय हिरेंवर नाव न घेता ताशेरं ओढलं होतं. तब्बल 32 कोटींचा हा घोटाळा असून सहकार खातं निश्चितपणे यावर पुढची कारवाई करेल, असा इशारा मंत्री भुसे यांना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अप्रत्यक्षपणे मागील काही महिन्यांपूर्वी दिला होता.

Kalyan Fire News : इमारतीच्या १० व्या मजल्यावरील घराला भीषण आग, घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अद्वय प्रशांत हिरे आणि एकूण 30 जणांविरोधात 30 मार्च 2023 ला मालेगावच्या रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्तऐवज तयार करून बँकेची 7 कोटी 46 लाख रुपयांची कर्ज उचलून फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता, त्यानंतर आरोपी अद्वय हिरे यांनी मालेगाव सेशन कोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती. त्यानंतर अंतरिम जामीनासाठी हायकोर्टाकडे ते गेले होते, मात्र 6 नोव्हेंबर 2023 ला तो अर्ज फेटाळताच आज स्थानिक गुन्हे शाखेनं भोपाळमधून त्यांना ताब्यात घेतलं आहे.

कोण आहेत अद्वय हिरे? 

  • अद्वय हिरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत
  • त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे
  • शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता
  • शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते 
  • शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून हिरे यांची ओळख


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply