Nashik Devendra Fadnavis : भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज : उपमुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : देशातील सर्वाधिक आणि सर्वोत्कृष्ठ पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाची ख्याती आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचेही स्वरुप बदलले असून, भविष्यात सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हयांचे आव्हान पोलीसांसमोर आहे.

त्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला सज्ज राहावे लागणार असून, याकरिता महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये आयोजित १२२ व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, ॲड. राहुल ढिकले, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर, अकादमीचे संचालक राजेशकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Cm Eknath Shinde : अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रारंभी संचलनात पहिल्या प्लाटूनद्वारे महिला अधिकाऱ्यांनी नेतृत्व केले. अभिजित काळे हे संचलनाचे मुख्य कमांडर होते. त्यांच्यासमवेत पथकांचे निरीक्षण करून उपमुख्यमंत्री फडणवीस मंचावर गेले. निशाण टोळीने राष्ट्रध्वज आणि अकादमीच्या ध्वजाचे शानदार संचलन केले. त्यानंतर संचालक राजेशकुमार यांनी उपनिरीक्षकांना कर्तव्याची शपथ दिली.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या १२२ व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राला १ ऑगस्ट २०२२ पासून सुरु झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून निवड झालेल्या ३४९ पुरुष व १४५ महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश असून १ प्रशिक्षणार्थी गोवा राज्यातील आहे. ४९४ पोलीस उपनिरीक्षकांपैकी ८८ टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व १२ टक्के पदव्युत्तर असल्याची अकादमीचे संचालक राजेशकुमार यांनी अहवाल वाचनात दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply