Nashik : सामूहिक आत्महत्याने नाशिक हादरले, एकाच कुटुंबातील चौघांनी आयुष्य संपवले

Nashik : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे धुरळा उडाला असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये अख्या कुटुंबाने मृत्यूला कवटाळलेय. नाशिकमधील देवळा तालुक्यातील फुले माळावाडी येथे चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. आत्महत्या करण्याचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. त्यानंतर आत्महत्याची नोंद करत तपास सुरू केला. पोलिसांकडून आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यात येत आहे. आत्महत्या करण्याचे कारण का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. माळवाडी येथील ४० वर्षांचा व्यक्ती, ३५ वर्षांची त्याची पत्नी, ८ वर्षांची मुलगी आणि २ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

Election Update : धक्कादायक बदल! मतदानाला अवघे तास बाकी असताना राज्यातील ‘या’ तीन नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या; कारण नेमकं काय?

आई-बाप आणि दोन मुलांचे मृतदेह फुले माळवाडीमध्ये घरात आढळून आल्याची घटना आज सकाळी घडली आहे.४० वर्षांच्या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तर बायको अन् दोन मुलांचा मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळले. यात देवळा पोलीस पोलीस निरीक्षक, उप पोलीस निरीक्षक सह पोलीस कॉनस्टेबल हे घटनास्थळी उपस्थित असून अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *