Nashik Crime : नेपाळी तरुणाला दिला पेठचा जन्म दाखला व आधार कार्ड; नाशिकमधील आधार केंद्रावरील दोघे ताब्यात

Nashik : आधार कार्ड बनवण्यासाठी लागणाऱ्या जन्म दाखला आणि शाळा सोडल्याच दाखला दोन हजार रुपयांमध्ये बनवून आधार कार्ड काढून देणाचे काम नाशिकच्या एका आधार केंद्रावर केले जात होते. याचा माध्यमातून नेपाळी तरुणाला नाशिकचा नागरिक बनविण्याचे काम करण्यात आले होते. या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोन संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून या तरुणांनी मखमलाबाद- मसरूळ या लिंक रोडवर तारांगण सर्विसेस हे आधार लिंक ऑफिस उघडलं होतं. यामध्ये त्यांनी एका नेपाळी तरुणाला नाशिकच्या पेठ तालुक्यांमध्ये जन्म झाल्याचा दाखला आणि आधार कार्ड केवळ दोन हजार रुपयांमध्ये दिलं होत. असे काही प्रकार केल्याचे देखील समोर आले आहे. 

Solapur : सोलापूर- पुणे महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, वाहनांच्या लांबच लांब रांगा

दरम्यान नेपाळी तरुणाच्या चारित्र्य दाखला तपासणीवरून म्हसरूळ पोलीसाना व्यक्तीचा संशय आला. यानंतर त्यांनी तारांगण सर्विसेसच्या फकीरा हुमान व रमेश साळवे यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या कार्यालयातून एका कॉलेजच्या बनावट शिक्यासह, विधानसभा सदस्याची सही व शिक्का असलेले ५ अर्ज, विवाह नोदणी कागदपत्र ताब्यात घेतले. याबाबत त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply