Nashik Accident : मद्यधुंद तरुणाचा नाशकात धिंगाणा, महिलेच्या कारला धडक, बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत अरेरावी

Nashik Accident : शहरात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता पाथर्डी फाटा  परिसरातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. मद्यधुंद कार चालकाने एका महिलेच्या कारला धडक दिली. अपघातानंतर आपली बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत मद्यधुंद तरुणाने महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या नागरिकांना दमदाटी केल्याचा प्रकार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरात तरुणाच्या कारने महिलेच्या कारला धडक दिली. समोरासमोर अपघात झाल्याने यात महिला चालक जखमी झाली. यानंतर महिलेच्या मदतीला धावलेल्या लोकांना तरुणाने दमबाजी आहे. 

Mumbai News : मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; ६० कोटींचे अमली पदार्थ जप्त

तरुणाची नागरिकांना दमबाजी

बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत तरुणाने नागरिकांना दमबाजी केली आहे. संशयित तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तरुणाच्या दमबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अंबड पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply