Manmad News : हिंदुस्थान पेट्रोलियम सर्व्हर डाऊन; पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठा ठप्प

Manmad (Nashik) : मनमाडच्या पानेवाडी येथे असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पातुन राज्यभरातील पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा करण्यात येत असतो. मात्र याठिकाणी असलेले सर्व्हर कालपासून डाऊन झाले आहे. यामुळे सर्व कामकाज थांबले असल्याने राज्यातील पेट्रोल पंपावर केला जाणारा इंधन पुरवठा देखील ठप्प झाला आहे. काल पासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे इंधन पुरवठा ठप्प झाला.

नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा प्रकल्प आहे. या ठिकाणाहून नाशिक जिल्ह्यासह राज्यात वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर टँकरच्या माध्यमातून इंधन पुरवठा करण्यात येत असतो. मात्र हा इंधन पुरवठा कालपासून ठप्प झाला असून सर्व्हर डाऊन असल्यामुळे इंधन पुरवठा खंडित झाला आहे. पेट्रोल व डिझेल भरून जाणारे ट्रँकरच्या देखील येथे रांगा लागलेल्या आहेत.

Operation Sindoor : एलओसीवर पाकड्यांचा नापाक गोळीबार, १३ नागरिक ठार, भारताकडून सीमाभागातील गावांचे स्थलांतर सुरू

पुरवठा नसल्याने पंपावरील इंधन संपले

पानेवाडीच्या प्रकल्पातुन रोज सुमारे ३५० टँकरच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल पुरवठा केला जातो. मात्र कंपनीतून इंधन पुरवठा होत नसल्यामुळे अनेक टँकर कंपनीच्या आवारात उभे आहे. इंधन पुरवठा होत नसल्याने पंप ड्राय झाले आहेत. तर काही ड्राय होण्याच्या मार्गांवर आहे. कंपनीतर्फे युद्ध पातळीवर सर्व्हर सुरु करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारत व इंडियन ऑइल प्रकल्पातून पूरवठा सुरळीत

दरम्यान पानेवाडी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम या प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली आहे. यामुळे राज्यातील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांवर होणारा पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र भारत पेट्रोलियम आणि इंडिया ऑइल कंपनीच्या प्रकल्पातुन इंधन पुरवठा सुरळीतपणे सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply