Narayan Rane : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

Narayan Rane : भाजप नेते नारायण राणे यंदा लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रचार सुरु केला आहे. या मतदारसंघात त्यांना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं आव्हान असणार आहे. मात्र, 'उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे श्रेष्ठ आहेत. त्यांनी प्रचार केल्यानंतर उमेदवार जिंकतो, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी राणे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. राणे यांनी यावेळी राज ठाकरेंचं भरपूर कौतुक केलं.

'राज ठाकरे माझे मित्र असून आमचे राजकारणापलीकडे आमचे संबध आहेत. त्यात मला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. मी त्यांना विचारलं की कोकणात प्रचाराला येणार का? तर ते हो म्हणाले. कोणतंह राजकारण न करता ते आज कोकणात प्रचारात येत आहेत, असे राणे म्हणाले.

'आम्ही दोघे मित्र आहोत. शिवसेनेत असतानाही आम्ही एकत्र काम केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी खरं काम राज ठाकरेंनी केलं आहे. खरंतर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज श्रेष्ठ आहेत. त्यांच्या प्रचारामुळे उमेदवार जिंकतो, असा दावा राणेंनी केला.

'विनायक राऊत हे दोन वेळा मोदींमुळे निवडून आले आहेत. आता ते निवडून येतील का? त्यांनी काय काम केलं आहे? त्यांचं शून्य काम आहे, अशी टीका राणेंनी केली.

'उद्धव ठाकरे टीका करतात. ते पोलीस संरक्षण वैगरे घेऊन बडबड करतात. त्यांच्याकडे पाच खासदार आहेत. या निवडणुकीनंतर एकही खासदार येणार नाही. त्यांची ताकद किती? त्यांनी काहीतरी काम करुन दाखवावं, असं आव्हान राणेंनी दिलं.

'बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांनी आता दुकान बंद करावं, आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या भावना माझ्याबाजूने असत्या. त्यांचा माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास आणि अभिमान होता. ही लढत होणार नसून मी एकहाती निवडून येईल, असाही दावा नारायण राणेंनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply