Narayan Rane : 'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे, तोंड उघडायला लावू नका! नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा,

Narayan Rane : 'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे आहे, तोंड उघडायला लावू नको. कोकणात आला आहात ना सरळ सरळ जा असं मी आवाहन करताे. आमच्या नेत्यांवर टीका कराल तर कोकणातील सर्व रस्ते बंद करून टाकीन. अडीच वर्ष मुख्यमंत्री, दोन दिवस मंत्रालयात कोकणासाठी काय काम केलं ते सांगावं असा इशारा वजा आवाहन मंत्री नारायण राणे  यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी दिले. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिर्के हायस्कूल मैदानात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेत नारायण राणे बाेलत हाेते. यावेळी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत, मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे नेते प्रकाश महाजन, मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे नेते वैभव खेडेकर, भाजप सहप्रभारी बाळ माने, मनसे सरचिटणीस गजानन राणे, भाजप नेते संदीप कुडतरकर, भाजपाचे राजेश हाटले, रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीचे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HSC SSC Result : मोठी बातमी! दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली; कुठे अन् कसा पाहाल निकाल?

मनसेबराेबर जिव्हाळ्याचे संबंध

नारायण राणे म्हणाले माझा आणि मनसेचा संबंध अनेक दिवसांपासूनचा आहे आणि जिव्हाळ्याचा आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेला पाचव्या नंबर वर आणले. मी तरुणांना रोजगारात यावे असे आवाहन केलं होतं आणि मी तरुणांसाठी काम करतोय ते राज ठाकरेंना आवडलं होतं त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. यावेळेला मोदींना मत दिलं म्हणजे नारायण राणेंना मत दिले. मी महाराष्ट्राचा साहेब नाही मी महाराष्ट्राचा सेवक आहे असेही राणेंनी म्हटलं.

ठाकरेंच्या सभेला कार्यकर्त्याला पाठविले : राणे

राणे पुढे बाेलताना म्हणाले बाजूला एक सभा होती. मी मुद्दाम कार्यकर्त्याला जायला सांगतिले. त्याला विचारले काय बोलले. पहिलं मोदींवर टीका नंतर उमेदवारावर टीका. आमच्या नेत्यांवर बाेलाल तर मातोश्रीची सर्व हिस्ट्री माझ्याकडे तोंड उघडायला लावू नका. कोकणात आला आहात ना सरळ सरळ जा मी आव्हान करतो.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply