Nandurbar News : मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरण; तिघांना 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, दहा हजार रुपयांचा दंड

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आराेपींना दहा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. संबंधित मुलगी मतिमंद असल्याचा गैरफायदा नराधमांनी घेतला हाेता. त्यांना शिक्षा सुनावताच न्याय मिळाल्याने बालिकेच्या आप्तवासियांना देखील अश्रु अनावर झाले हाेते. 

सन 2019 कालावधीत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका 16 वर्षीय पिडीत बालिका मतिमंद असल्याचा गैरफायदा घेऊन 3 आरोपींनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत संधी साधून पिडीत मतिमंद बालिकेला एका नाल्याच्या पुलाखाली नेऊन तिचेवर सामुहिक बलात्कार केला.

Shinde Government : तरुणांसाठी आनंदाची बातमी; नमो महारोजगार मेळाव्यांमधून निर्माण होणार २ लाख रोजगार

या प्रकरणी गेली चार वर्ष न्यायालयात सुनावणी सुरु हाेती. या बालिकेला न्याय मिळाला असून अत्याचार करणाऱ्या तिन्ही नराधमांना जिल्हा सत्र न्यायालयाने वीस वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply