Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील खाजगी शाळांकडून आर्थिक लूट; गणवेश खरेदीसाठी एकाच दुकानाचे नाव

Nandurbar News : शाळा सुरु झाल्या असून आता पालकांकडून मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश खरेदीची लगबग सुरु आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील खाजगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर येत आहे. अन्य दुकानांमध्ये कमी दारात गणवेश मिळत असताना एका विशिष्ट दुकानातूनच गणवेश खरेदीचे सांगितले जात आहे. 

शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने आता पालकांकडून मुलांसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरु आहे. नंदुरबार शहरातील विविध नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश घेण्यासाठी एकाच दुकानातून गणवेश खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांची लूट होत आहे. अन्य दुकानांवर कमी दरात गणवेश उपलब्ध असताना देखील जास्त दराने गणवेश खरेदी करून पालकांची आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

शिवसेनेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन 

या सदर प्रकाराबाबत शिवसेना उबाठा पक्षामार्फत जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. खाजगी शाळांकडून होत असलेल्या या प्रकाराबाबत कारवाई न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे..

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply