Nandurbar News : बेकायदा जमीन हडपल्याचा आरोप; संतप्त शेतकऱ्यांचा सुजलोन कंपनीत ठिय्या

Nandurbar News : सुजलान व तिची उपकंपनी सर्जन रियालतीज यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने हस्तांतरित केल्या. इतकेच नाही तर बेकायदेशीर जमिनी बळकावल्या असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे कंपनीच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी कंपनीतच ठिय्या आंदोलन केले.

गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीच्या मार्फत न्याय मिळावा; यासाठी आंदोलन करीत आहेत. परंतु अनेक वर्षे लोटूनही यावर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज छडवेल येथील सुजलोनच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. जो पर्यंत आमच्या न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील असे यावेळी समिती व शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.  

Ahmedpur Fire News : १० शॉपिंग दुकानांना भीषण आग; करोडो रुपयांचे नुकसान, अहमदपूर शहरातील पहाटेची घटना

२२ एप्रिलचा अल्टिमेटम 

परंतु सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २२ एप्रिल पर्यंतचा वेळ मागितल्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. जर २२ एप्रिलला या संदर्भात योग्य तो निर्णय लागला नाही; तर  पवन ऊर्जा जमिन हक्क कामगार संघर्ष समिती व शेतकरी सुजलोन कंपनीला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply