Nandurbar News : काँग्रेसला नंदुरबारमध्ये खिंडार! राहुल गांधींच्या यात्रेची एन्ट्री, तिथेच बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

Nandurbar News : आज राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच जिल्ह्यातील बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पक्षाला रामराम ठोकला असून उद्या ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. आजपासून नंदूरबार येथून भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. एकीकडे राहुल गांधींची यात्रा नंदुरबारमध्ये प्रवेश करत असतानाच जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Sangli News: अल्लड वयातलं प्रेम, एकांतातली भेट आणि प्रेयसीची निघृण हत्या; सांगलीतल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला

राहुल गांधी महाराष्ट्रात असताना माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पद्माकर वळवी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे यांची भेट घेतली. उद्या ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. राहुल गांधी यांची यात्रा नंदुबारमध्ये येताच बड्या नेत्याने साथ सोडल्याने काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील काँग्रेसचे ब़डे नेते होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे खेळ मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्यांची मुलगी सिमा वळवीही राजकारणात सक्रिय झाल्या असून त्या जिल्हा परिषदेवर कार्यरत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply