Nandurbar News : नंदुरबारमध्ये एक लाखाची दारू जप्त; ‘एलसीबी’ची चौघांवर कारवाई

Nandurbar News : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व दारूबंदी विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत नंदुरबार शहरातील विविध ठिकाणी बियर शॉप विक्रेत्यांवर अवैधरीत्या परवानगी नसलेल्या देशी-विदेशी दारू विक्री करताना मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे. यात १ लाख ५ हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सुरु केली आहे.अवैधरीत्या दारूची विक्री व वाहतुकीविरुद्ध जिल्हा पोलिस दलाने धडक मोहीम हाती घेतलेली आहे. कारवाईत सातत्य ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शहर व परिसरात कारवाई करण्यात आली. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा व दारूबंदी विभागाकडून अचानकपणे मोहीम राबवून एक लाख चार हजार ५९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

MNS Meeting : मनसे महायुतीसोबत जाणार का?, पक्षाच्या लोकसभा आढावा बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

चौघांवर गुन्हे दाखल 

सदरचा कारवाईत कल्पेश रवींद्र कासार (रा. श्रीराम चौक, देसाईपुरा, नंदुरबार), चेतन रमेश चौधरी (रा. देसाईपुरा, नंदुरबार), हेमंत दिलीप मराठे (रा. पेडकाईनगर, नंदुरबार), अर्जुन प्रकाश राजपूत (रा. हिंगलाज मातानगर, नंदुरबार) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply