Nandurbar Kanbai Utsav: खानदेशाची कुलस्वामिनी कानबाई माता उत्सवाचा जल्लोष; मिरवणूक काढत विसर्जन

नंदूरबार : सणांचा महिना श्रावण सुरु होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोलासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात साजरा केला जात असतो. कोकणात सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात. त्याचप्रमाणे खानदेशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य घराकडे न चुकता येतात. अवघ्या दीड दिवसांचा हा सण  खानदेशातील प्रत्येक कुटुंबाला एकतेचा संदेश देत वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो. एक दिवसाचे पाहुनी आलेल्या कानुबाई मातेला आज मोठ्या उत्साहात वाजत गाजत निरोप देण्यात आला. खानदेशातील कष्टकऱ्यांची कुलदैवत असलेल्या कानबाई मातेला शेतकऱ्यांनी पावसासाठी साकडे घातले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply