Nandurbar Heavy Rain : नंदुरबार जिल्ह्यासह शहरात पहाटेपासून मुसळधार पाऊस; संतत धार पावसामुळे नदी नाल्यांना पूर

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या दरम्यान आज सकाळपासून देखील पावसाचा जोर कायम आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. नवापूर तालुक्यातील नेसू नदीला ही मोठा पुर आला असून नेसून नदी धोक्याच्या पातळीच्या जवळ वाहत आहे. तसेच अनेक सकल भागांमध्ये पावसाच पाणी साचले आहे.

नंदुरबार शहर व जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाळा सुरवात झाली. मागील २४ तासापासून पावसाची संततधार सुरु आहे. काही भागात तर मुसळधार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे अनेक सकळ भागात पावसाचे पाणी साचले आहे. तर नळवा रस्ता परिसरात असलेला रेल्वे बोगद्याखाली दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले असून रेल्वे बोगद्याखाली पाणी गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

Ambadas Danve : पीएम मोदींच्या दौऱ्याला विरोध, अंबादास दानवेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

संततधार पावसामुळे नवापूर तालुक्यातील नेसू नदीला मोठा पूर आला आहे. या पुरात पाईपांचा मोठा गठ्ठा वाहून येत असल्याचे दिसल्यावर तरुणांनी पुलावर उभे राहत जीव धोक्यात घालून पाईपांचा गठ्ठा बाहेर काढून तो घेऊन जाण्यासाठी धावपळ पाहण्यास मिळाली. ग्रामीण भागात जल जीवन मिशन ते काम अपूर्ण असून त्याचे साहित्य उघड्यावर पडले आहे. हे साहित्य नदीच्या पुरात वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply