Bogus Cotton Seeds : नंदुरबारमध्ये ३ लाखांचे बोगस बियाणे जप्त; खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई

Nandurbar : खरीप हंगाम तोंडावर आहे. त्या अनुषंगाने शेतकरी आतापासून बियाणे खरेदीच्या तयारीत आहेत. मात्र मार्केटमध्ये बनावट बियाणे देखील विक्रीसाठी आणले जात आहे. नंदूरबार जिल्ह्यात कृषि विभागाची धडक कारवाई करत अंदाजित ३ लाख रुपये किंमतीचे प्रतिबंधीत असलेल एचटीबीटी कंपनीचे बोगस कापसाचे बियाणे जप्त केले आहे. यंदाच्या हंगामातील कृषी विभागाची हि पहिलीच कारवाई आहे.

नाशिक विभागीय सहसंचालक कृषी नाशिक सुभाष काटकर, नंदुरबार जिल्हा कृषी अधिक्षक चेतनकुमार ठाकरे, नंदुरबार जिल्हा कृषी विकास अधिकारी किशोर हडपे व नाशिक विभागीय नियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली २० मे रोजी सदरची कारवाई करण्यात आली आहे. कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबार येथे प्रतिबंधित असलेले एचटीबीटी बोगस कापुस बियाण्याचे पाकीट आल्याची माहिती मिळाली.

Thane : ठाण्यात टेंभी नाक्यावर शिवसैनिकांना मारहाण, धारधार शस्त्राने वार केले, घटना CCTV कैद

बियाणे विक्री करताना रंगेहाथ पकडले

खरीप हंगाम सुरु होण्याला अद्याप बरेच दिवस बाकी आहेत. मात्र मान्सून पूर्व कापूस लागवड करणारे शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत. त्या अनुषंगाने बियाणे विक्रीसाठी आणले जात आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पाळत ठेवून सापळा रचला. या दरम्यान नंदुरबार येथील अनिल शिंदे यांनी त्यांच्या घरी ठेवलेले प्रतिबंधित कापूस बियाणे शहरात विक्री आणले. यानंतर पथकाने बियाणे विक्री करत असताना रंगेहाथ पकडले.

पोलिसात गुन्हा दाखल

दरम्यान नंदुरबार पोलीस ठाण्यात अनिल शिंदे यांच्या विरोधात बियाणे कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही; असा कडक इशारा नाशिक विभागीय सहसंचालक कृषी सुभाष काटकर यांनी दिला आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply