Nanded : धक्कादायक! उमरी तालुक्यात आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ

Nanded :  नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १९) एक धक्कादायक घटना घडली. धर्माबाद येथील रेल्वेरुळावर एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आले. साईनाथ अशोक चंदापुरे (वय २४) आणि सविता होळगावे (वय १९) अशी मृत तरुण-तरुणीची नावे आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनी आत्महत्या केली की घातपात झाला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मृत तरुण आणि तरुणी दोघेही उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सविता आणि साईनाथ या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, ३ महिन्यांपूर्वी सविताचे लग्न लग्न झाले होते. ही विवाहित तरुणी सासरहून माहेरला म्हणजेच नागठाणा बुद्रुकला आली होती.

Gadchiroli Rain : गडचिरोलीत मुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, 120 गावांचा तुटला संपर्क

गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत ती आपल्या आईसोबतच होती. मात्र, त्यानंतर सविता अचानक गायब झाली. ती बाहेर कधी निघून गेली कुणालाच याची कल्पना लागली नाही. कुटुंबियांनी शोधाशोध घेतली असता, तिचा आणि गावातील एका तरुणाचा मृतदेह रेल्वेरुळावर आढळून आला.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. दोघांनी आत्महत्या केली, की घातपात झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

धर्माबादहून उमरीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रात्री दीड ते सकाळी सातपर्यंत तीन ते चार गाड्या धावतात. यातील एका गाडीखाली दोघांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथामिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply