Nana Patole News : महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

Nana Patole News :  आगामी लोकसभा निवडणुकासाठी सर्वच कंपन्यांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीने देखील आपली तयारी सुरु केली आहे. मात्र जागावाटपावरुन महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे.

मात्र वाद टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते सामंजस्याची भूमिका घेतना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील महाविकास आघाडीच्या जागावाटपावर भाष्य केलं आहे.

Sana Khan Case : सना खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीच्या घरातील मोबाईल आणि लॅपटॉप जप्त

महविकास आघाडीमध्ये कुठलाही वाद नाही. महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकासीठीचा फॉर्म्युला ठरला आहे. लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून येणार, असा दावा देखील नाना पटोले यांनी केला आहे. 

कोणत्या पक्षांची किती जागांची मागणी?

  • काँग्रेसची २२ जागांची ‌मागणी.

  • शिवसेनेची २३ जागांची‌ मागणी.

  • राष्ट्रवादी शरद पवार गटाची १० ते ११ जागांची‌ मागणी.

  • प्रकाश आंबेडकर यांनी सर्व पक्षांना समान १२-१२-१२-१२ जागांचा फॉर्म्युला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply