Nana Patekar News : नाना पाटेकर उतरणार राजकारणाच्या आखाड्यात? पुण्यातील 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता

Nana Patekar News : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. अभिनेते नाना पाटेकर पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

एका वृत्तवाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी समोर कुणीच नसल्याचं विधान नाना पाटेकर यांनी केलं होतं. नाना पाटेकर यांच्या विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.

Beed News : हृदयद्रावक! वृद्ध पत्नी कापूस वेचायला गेली, घरात अनर्थ घडला; झोपलेल्या अंध पतीचा आगीत होरपळून मृत्यू

यापूर्वी गणपती दर्शनाला गेलेल्या अजित पवारांकडेही नाना पाटेकर यांनी खडकवासल्यातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.

घेरा सिंहगड येथे  नाना पाटेकर यांचं फार्महाऊस आहे. शेतीसाठी बराच काळ पाटेकर यांचा खडकवासला येथे मुक्काम असतो. त्यामुळे खरंच नाना पाटेकर निवडणूक लढवणार की या चर्चा हवेत विरुन जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

काय म्हणाले होते नाना पाटेकर?

'तुम्ही बघाच मोठ्या संख्येने भाजपच येणार. कोण येईल आणि कसा येईल हे सांगता येत नाही. पण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ३५० ते ३७५ जागा मिळतील. देशामध्ये भाजपाशिवाय पर्याय नाही. भाजपकडून ऐवढं चांगलं काम चालले आहे. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply