Nainital Forest fire: नैनितालच्या जंगलात भीषण वणवा; निवासी भाग धोक्यात, लष्कराला पाचारण...काय आहे परिस्थिती?

Nainital Forest fire : उष्णता वाढत असतानाच उत्तराखंडमधील नैनिताल जिल्हा मुख्यालयाजवळील जंगलात लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले आहे. आगीच्या तीव्र झळा नैनितालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग विझवण्यासाठी नैनिताल प्रशासनाने वन विभागाचे कर्मचारी आणि लष्कराचे जवान तैनात केले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरही बोलवले जाऊ शकतात.

वृत्तानुसार, नैनिताल जिल्हा मुख्यालयाजवळ लागलेल्या आगीमुळे पाइन्स परिसरात असलेल्या हायकोर्ट कॉलनीतील रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती.

NOTA: 'नोटा'ला सर्वाधिक मतं मिळाल्यास पुन्हा होणार निवडणूक? सुप्रीम कोर्टाने उचललं महत्त्वाचं पाऊल

पाइन्सजवळील एका जुन्या आणि रिकाम्या घराला आग लागली आहे. हायकोर्ट कॉलनीचे कोणतेही नुकसान झाले नाही, परंतु आग इमारतींच्या अगदी जवळ आली आहे, असे एका स्थानिक रहिवाशाने पीटीआयला सांगितले. काल संध्याकाळपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.पाइन्स क्षेत्राजवळील लष्कराच्या संवेदनशील स्थानांवर आग लागण्याची शक्यता आहे.

जंगलातील आगीमुळे नैनीताल जिल्हा प्रशासनाने नैनी तलावात नौकाविहार करण्यासही बंदी घातली आहे.आग विझवण्यासाठी नैनिताल प्रशासनाने 42 जवान तैनात केले आहेत. नैनितालचे विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर जोशी यांनी पीटीआयला सांगितले की, "आग विझवण्यासाठी आम्ही 40 कर्मचारी आणि मानोरा रेंजमधून दोन वन रेंजर्स तैनात केले आहेत."

उत्तराखंडच्या वन विभागाने सांगितले की, 24 तासांत राज्यातील कुमाऊं भागात जंगलालाआग लागण्याच्या 26 घटना आणि गढवाल प्रदेशात पाच घटना घडल्या आहेत. आगीमुळे ३३.३४ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले आहे. तर गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरपासून राज्यात जंगलाला आग लागण्याच्या एकूण 575 घटनांची नोंद झाली आहे, ज्यामुळे 689.89 हेक्टर वनक्षेत्र प्रभावित झाले आहे आणि त्यामुळे राज्याचे 14 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

जाखोली आणि रुद्रप्रयागमध्ये जंगलात आग लावल्याप्रकरणी उत्तराखंडच्या अधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली. रुद्रप्रयाग विभागीय वन अधिकारी अभिमन्यू यांनी एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, जंगलातील आग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकाने ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्यांपैकी जाखोलीच्या ताडियाल गावातील नरेश भट्ट हा जंगलात आग लावताना पकडला गेला होता. त्याच्या मेंढ्यांना नवे गवत मिळावे म्हणून त्याने आग लावली होती. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रशासनाला सतर्क राहून जंगलातील आग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply