Nagpur Rain : नागपूरात धुवाधार पाऊस! रस्त्यांना नदीचे स्वरूप, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत;

Nagpur Rain : नागपूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नागपूरच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. नागपूरातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसारउपयोगी वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूरमधील पावसाचा जोर वाढत चालला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नागपूरच्या मुसळधार पावसाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत प्रशासनाला सतर्क

नागपूर शहारात मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर विमानतळाकडे जणाऱ्या मार्गावर पाणी साचलं आहे. याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नागपूरच्या वाठोडा परिसरात तरोडी खुर्द येथील एनएमआरडीएअंतर्गत येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील वसाहतीत मुसळधार पावसामुळे पाणी शिरले आहे. या वसाहतीशेजारी नाला असून मुसळधार पावामुळे हा नाला तुडुंब भरून वाहत आहे. या नाल्याचे पाणीच अनेक घरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. एनएमआरडीए आणि नागपूर महानगर पालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी, नुकसान भरपाई द्यावी, तसंच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Neet Exam Issue : नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; पटनानंतर रांची कनेक्शन समोर, RIMS चा विद्यार्थी ताब्यात

नागपूरच्या नरेंद्र नगर येथील स्वामी स्वरूपानंद सोसायटीमध्ये आज झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात अपार्टमेंटमध्ये पाणी शिरले आहे. या भागातील रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. नागपूरच्या नंदनवन कॉलनी पावसाचे पाणी अनेक घरामध्ये शिरले आहे. नागपुरातील श्रीहरीनगरात सिमेंटचे रस्ते बांधताना नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला. रस्ते बांधताना पाण्याचा निचरा कसा होईल याचे नियोजन करणे गरजेचे होते. पण त्याचा फटका आता नागरिकांना बसत आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्यांमुळे रस्ते उंच आणि घर खाली गेले आहेत. यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे श्रीहरी नगर येथे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

नागपूरच्या मनीष नगरकडे जाणारा अंडरपास रोडमध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी तुंबल्याने वाहतूक बंद झाली आहे. तर नरेंद्र नगर पुलाखाली पाणी तुंबल्याने ट्रक अडकला आहे. शहातातील पडोळे चौक यासह शहरातील अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीने पावसाचे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply