पुणे - महापालिकेच्या प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना थेट आर्थिक मदत करण्यास महापालिका हात आखडता घेत आहे. त्याऐवजी ‘टीडीआर’च्या माध्यमातून नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव ठेवला जातो. टीडीआरचे पडलेले दर आणि आर्थिक मदतीपेक्षा कमी फायदा असला, तरी गेल्या पाच वर्षांत महापालिकेने २९५ प्रकरणांमध्ये तब्बल तीन हजार ८३ कोटी रुपयांचा टीडीआर देऊन महापालिकेच्या तिजोरीतील गंगाजळीची बचत केली आहे.
पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील अग्निशामक केंद्र, क्रीडांगण, उद्यान, मंडई यासह इतर आरक्षणे, १२ मीटरपासून ते ६० मीटर रुंदीचे रस्ते आदी कारणांसाठी खासगी मालकांच्या जागा भूसंपादन कराव्या लागतात. भूसंपादन कायद्यानुसार, खासगी मालकांची जागा ताब्यात घेताना त्यांना जागेच्या किमतीच्या दुप्पट रक्कम नुकसानभरपाई म्हणून द्यावी लागते. त्यामुळे ही रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये जाते. महापालिकेच्या विकासकामांना, मोठ्या प्रकल्पांना जागेची आवश्यकता असली, तरी महापालिकेकडून रोख स्वरूपात भरपाई देण्यास नकार दिला जातो. त्याऐवजी टीडीआर, एफएसआय, बॉण्ड असे पर्याय जागा मालकांसमोर ठेवले जातात. शहराच्या विविध भागात रेडीरेकनरचे दर वेगवेगळे आहेत, त्या भागानुसार टीडीआरचे दरही बदलतात. २०१६ नंतर बांधकाम क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे शहरातील टीडीआरचे दरही मोठ्याप्रमाणात पडले. अनेक बांधकाम व्यावसायिक व इतरांकडे मोठ्याप्रमाणात टीडीआर शिल्लक असल्याने त्यास मागणीही नव्हती. एकीकडे अशी स्थिती असताना, दुसरीकडे भूसंपादनासाठी महापालिकेने टीडीआरचा पर्याय खुला ठेवला आहे. २०१७-१८ ते फेब्रुवारी २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत ३०१ प्रकरणांमध्ये तब्बल तीन हजार ८३ कोटी रुपये किमतीचा टीडीआर नुकसान भरपाई म्हणून दिला आहे.
टीडीआरची प्रकरणे वाढली
बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे महापालिकेकडून नुकसान भरपाई म्हणून टीडीआर घेण्याचे प्रमाण २०१७-१८ नंतर कमी होत होते. २०१७-१८ ला ९५ प्रकरणांमध्ये टीडीआर दिला. त्यानंतर सलग तीन वर्ष प्रस्ताव दाखल होण्याचे प्रमाण कमी झालेले असताना, २०२१-२२ या वर्षात पुन्हा ही संख्या वाढून ५१ पर्यंत आली आहे.
भरपाई म्हणून डबल टीडीआर
भूसंपादन कायद्यानुसार जागा मालकाला जागेच्या किमतीच्या दुप्पट रक्कमेची भरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे महापालिकेकडूनही जागा मालकांना गावठाण सोडून विरळ वस्तीत दुप्पट, तर गावठाणामध्ये तिप्पट टीडीआर दिला जातो.
टीडीआर म्हणजे काय?
हस्तांतरणीय विकास हक्क (ट्रान्स्फर ऑफ डेव्हलपमेंट राइट्स-टीडीआर) जे प्रमाणपत्रांच्या स्वरूपात जागामालकाला प्राप्त होतात. जागामालक याचा वापर स्वतः बांधकामासाठी करून त्याच्या जागेवर एफएसआयपेक्षा जास्त बांधकाम करू शकतो किंवा बाजारातून रोख रक्कम उपलब्ध करण्यासाठी त्याची विक्रीही करू शकतो.
भूसंपादन करताना रोख मदत येणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना मोबदला म्हणून टीडीआर देण्यात येतो. गेल्या पाच वर्षांत २९५ प्रकरणांमध्ये तीन हजार कोटी रुपये इतक्या किमतीचे टीडीआर नुकसानभरपाई दिली आहे. त्यामुळे महापालिकेचा निधी बचत झाला व प्रकल्पही मार्गी लागले आहेत. टीडीआरची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका
महापालिका रोख मदत देत नाही, त्यामुळे नागरिकांना टीडीआरच घ्यावा लागतो. पण, टीडीआरची प्रक्रिया किचकट असून, फाइल एक-एक वर्ष पडून राहते. या कामाच्या पद्धतीत बदल झाला, तर टीडीआर घेण्याकडे नागरिकांचा कल वाढेल. तसेच, सध्या बाजारपेठ रेडीरेकनरच्या दराच्या चाळीस टक्केच दर टीडीआरला मिळत आहेत, हे प्रमाणही वाढले पाहिजे.
- सुधीर कुलकर्णी, नागरिक हक्क संस्थाहे पण वाचा-
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
