Nagpur News : रेल्वे स्टेशनवरुन दाम्पत्याचं 6 महिन्यांचं बाळ चाेरलं, नागपूर पाेलिसांकडून एकास तेलंगणात अटक

Nagpur News : नागपूर रेल्वे स्थानकावर भीक मागून राहणाऱ्या दाम्पत्याच्या सहा महिन्यांचा बाळाचं दोघांनी अपहरण केले हाेते. त्यानंतर दाेघेही घटनास्थळावरुन पळून गेले हाेते. दरम्यान या घटनेनंतर काही तासांतच दोघांपैकी एकाला तेलंगणा येथील मंचेरियातून रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली.

या घटनेची प्राथमिक माहिती अशी - नागपूरच्या रेल्वे स्थानकावर भीक मागून वाटेल तिथं राहणारे दाम्पत्य बाळ पाळणाऱ्या दोघांना दिसले. त्यानंतर बाळाला पळवण्यासाठी जवळीक साधून त्यांना खाऊ पिऊ घातले. दाम्पत्य झोपी जाताच भल्या पहाटे दाेघांनी बाळ पळवून नेले.

Ahmednagar News : पंकजा मुंडेंना अहमदनगरमधून विधानसभेचं तिकीट द्या; नक्कीच निवडून येतील, भाजप पदाधिकाऱ्याची मागणी

या घटनेची माहिती दाम्पत्याने रेल्वे पोलिसांनी दिली. पाेलिसांनी तातडीने तपास सुरु केला. संबंधित दाेघे बाळासह तेलंगणा राज्यात पळाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. नागपूर रेल्वे पोलिसांनी तेलंगणामधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाला अटक केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *