Nagpur News : भरधाव स्कॉर्पियो थेट घरात घुसली; ८ वर्षीय चिमुकला गंभीर जखमी, थरकाप उडवणारी घटना

Nagpur Scorpio Car Accident : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या स्कॉर्पियो कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारने थेट रस्त्यालगत असलेल्या घराला जोरदार धडक दिली. 

ही धडक इतकी भीषण होती की, घराची भिंत पडून कार थेट घरामध्ये शिरली. या भयंकर घटनेत ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीतील आयबीएम रोड परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारच्या धडकेत घराची भिंत पडली असून मोठं नुकसान देखील झालं आहे.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आयबीएम रोड परिसरात सायंकाळच्या सुमारास एक भरधाव स्कॉर्पियो आली. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कारने थेट रस्त्यालगत असलेल्या एका घराला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये घराची भिंत पूर्णपणे कोसळली. या भयंकर घटनेत ८ वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply