Nagpur Crime : दारू पिताना हटकलं, पोलिसांनाच शिवीगाळ करत मारहाण, आरोपी ताब्यात

Nagpur Crime : नागपूरमधून एक धक्कादायकद घटना समोर आली आहे. दारू पिताना हटकल्याने संतापलेल्या एका व्यक्तीने पोलिसांवरच शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपीचे नाव अंकित गोस्वामी असे आहे. तो नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी आहे. सोमवारी रात्री तो झिंगाबाई टाकळी येथील जुन्या वस्तीतील गीतांजली गार्डन परिसरात आपल्या मित्रासोबत दारू पित होता. त्यावेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांनी त्याला पाहून हटकलं. अकिंत आधीच दारूच्या नशेत होता. त्याला राग अनावर झाला.
अंकितने संतापाच्या भरात पोलिसांशी वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच पोलिसांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मोबाईल व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मित्र आणि दोन महिला नातेवाईकांनी आरडाओरड करत अंकितला गाडीतून जबरदस्तीने खाली उतरवले.

यानंतर अंकितने पुन्हा पोलिसांवर हल्ला करत मारहाण केली. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मानकापूर पोलिस ठाण्यात नेले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply