Nagpur : लग्नसमारंभ आटोपून येताना ट्रकने दुचाकीला चिरडलं, काकू-पुतण्याचा मृत्यू, ४ वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला

Nagpur : लग्नसमारंभ आटोपून घरी परत येताना कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकीवरून घराकडे निघालेल्या कुटुंबाला ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर ४ वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचवालाय. नागपूरमधील कुही तालुक्यातील गोंडीबोरी फाटा येथे हा दुर्दैवी अपघात झाला.

काकू, पुतण्या आणि ४ वर्षांचा चिमुकला लग्न आटोपून दुचाकीवरून घराकडे येत होते. गोंडीबोरी फाट्यावर आले असता भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या अपघातात काकू आणि पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. तर चार वर्षाचा सार्थक थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. किशोर मेश्राम आणि गुणाबाई मेश्राम यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर ४ वर्षाचा सार्थक जखमी झालाय.

Pune : पुण्यात रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा; जीवाणूसह विषाणू चाचणी सुविधा

किशोर मेश्राम हा काकू गुणाबाई आणि ४ वर्षांचा सार्थक याच्यासोबत लग्नासाठी गेला होता. लग्न आटोपल्यानंतर दुचाकीवर तिघे घरी येत होते. त्याचवेळी गोंडीबोरी फाट्यावर एका ट्रकने जोराद धडक दिली. या अपघातात किशोर आणि गुणाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. दैव बलवत्तर म्हणून चार वर्षांचा सार्थक थोडक्यात बचावला.

किशोर मेश्राम हा आपली काकू गुणाबाई मेश्राम व सार्थकसोबत दुचाकीवर घराकडे येत होते. त्याचवेळी गोंडीबोरी फाट्यावळ समोरच्या वाहनाने जागीच ब्रेक मारल्याने किशोरचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. किशोरची गाडी बाजूला येणाऱ्या ट्रकच्या समोर आली अन् जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात गुणाबाई व किशोर जागीच मृत्यू झाला. तर सार्थक जखमी झाला. जखमी सार्थक याच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply