Nagpur : हत्येच्या प्रयत्नात गंभीर इजा आवश्यक नाही तर...; हायकोर्टाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठेवली कायम; काय आहे प्रकरण?

Nagpur : नागपूरच्या उच्च न्यायालयाने पत्नीच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणातील सुनावणीमध्ये न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले की, हत्येच्या प्रयत्नात गंभीर इजा आवश्यक नाही, परंतु आरोपीच्या हेतूचा, म्हणजे पत्नीला ठार मारण्याचा उद्देश, हे सिद्ध करणे अधिक महत्त्वाचे आहे.

या प्रकरणात आरोपी अनिल लक्ष्मण मोहोड हा अमरावती जिल्ह्यातील चिखलसांवगी येथील रहिवासी आहे. त्याला पत्नी वंदना हिच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा दोषी ठरवण्यात आले आहे. २४ जून २०२१ रोजी, वंदनाला तिच्या बँक खात्यातून एक विशिष्ट रक्कम काढण्यास सांगितल्यावर तिने नकार दिला. त्यानंतर, आरोपी चाकू घेऊन तिला धमकावायला गेला आणि ती रक्कम देण्यास नकार देताच त्याने तिच्या पोटात चाकू भोसकला. यामुळे, त्याचा हेतू स्पष्ट झाला की, त्याला पत्नीला ठार मारायचं होतं.

Shirpur Crime : कामाचे पैसे मागितल्याचा राग; चार- पाच जणांकडून तरुणाला बेदम मारहाण

न्यायालयाने या प्रकरणातील गंभीरतेचा विचार करत आरोपीचा हत्येचा उद्देश सिद्ध मानला. पत्नीला शारीरिक जखमा गंभीर नसल्या तरी आरोपीच्या हेतूला महत्त्व देऊन त्याला गुन्ह्यातून मुक्त करण्याचा निर्णय नाकारला. आरोपीने पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला केला होता, आणि त्याच्या कृतीला न्यायालयाने गंभीर दृषटिकोनातून पाहिले. त्यामुळे, आरोपीच्या शिक्षा कायम ठेवत न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि त्याला कारावासाची शिक्षा दिली.

सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये आरोपीला दोषी ठरवून दहा वर्षांचा कठोर कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, परंतु उच्च न्यायालयाने त्याचे अपील फेटाळले आणि त्याच्या शिक्षा कायम ठेवली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply