Nag Panchami 2022: कधी आहे नागपंचमी? जाणून घ्या तिथी महत्त्व आणि शुभ मुहूर्त

Nag Panchami 2022 Date, Time And Significance: नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 2 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सापांची पूजा करण्याची प्रथा आहे. नाग हे शिवप्रभूंचा अलंकार आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा केल्याने शक्ती, संपत्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. नागपंचमीच्या दिवशी महिला विधीवत वारुळाची पूजा करतात आणि सर्पदेवाला दूध अर्पण करतात. जाणून घेऊन यंदा नागपंचमीचे शुभ मुहूर्त  आणि महत्व

नागपंचमी पूजा विधी (Nag Panchami Puja Ritual)

नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. नागदेवतांची पूजा करताना हळद, रोळी, तांदूळ, फुले अर्पण केली जातात. कच्च्या दुधात तूप आणि साखर घालून नागदेवाला ते अर्पण केले जाते. यानंतर आरती करून नागदेवाचे ध्यान करावे आणि शेवटी नागपंचमीची कथा ऐकावी 

नागपंचमी 2022 शुभ मुहूर्त (nagpanchami 2022 auspicious time)

नागपंचमी तिथी – 2 ऑगस्ट 2022, मंगळवार
नागपंचमी तिथी प्रारंभ – 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 05:13 वाजेपासून
नागपंचमी तिथी समाप्ती – 3 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 05:41 वाजेपर्यंत
नागपंचमी पूजा मुहूर्त – सकाळी 06:05 वाजेपासून ते सकाळी 08:41 वाजेपर्यंत 

नागपंचमीचे महत्व (Significance of Nagpanchami)

हिंदू धर्मात सापाला देवाचे स्थान आहे आणि त्यांची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा केली जाते आणि त्यांना दूध अर्पण केले जाते. नागपंचमीच्या दिवशी सापाच्या पूजेसोबतच महादेवाची पूजा केल्याने जीवनातील काल सर्प दोष समाप्त होतो असे मानले जाते. तसेच सापांच्या पूजेमुळे राहू आणि केतूचे अशुभ परिणाम देखील दूर होतात. या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सापाचे चित्र लावल्यास घरावर नागदेवाची विशेष कृपा होते आणि घरातील लोकांचे सर्व दु:ख दूर होतात अशी देखील मान्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply