Murbad : पीएफ आणि पेन्शनसाठी १० वर्षापासून प्रतीक्षा; मुरबाडमधील निवृत्त एसटी कर्मचाऱ्याची इच्छामरणाची मागणी

Murbad : राज्य परिवहन महामंडळातील चालक व वाहक या कर्मचाऱ्यांना पगार कमी असतो. यात हे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळणारी रक्कम देखील अधिक नसते. शिवाय महामंडळाकडून ती लवकर मिळत नसल्याने निवृत्ती नंतर कर्मचारी अडचणीत सापडतो. अशाच प्रकारे ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला १० वर्षांपासून पीएफ आणि पेन्शन मिळालेली नाही. त्यामुळं या कर्मचाऱ्याने थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची विनंती केली आहे.

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अल्प स्वरूपात असते. यात दिले जाणारे पेन्शन देखील ५ ते १० हजार रुपयांच्या दरम्यान असते. तरी देखील महामंडळाकडून बऱ्याचदा हि रक्कम देण्यास विलंब करण्यात येत असतो. यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडत असतो. अशाच प्रकारे मुरबाड मधील एसटी कर्मचाऱ्याला पेन्शन व पीएफ न मिळाल्याने तो अडचणीत सापडला आहे.

Kalyan Accident: कल्याणमध्ये विचित्र अपघात, रिक्षाला धडक देऊन डंपर उल्हास नदीत कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू; दोघे बेपत्ता

कुटुंबियांवर उपासमारीची वेळ

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी असलेले मुरबाडमधील राजेंद्र सरनोबत हे १० वर्षांपूर्वी एसटीच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना अजूनही त्यांची पेन्शन, पीएफ मिळालेलं नाही. याबाबत त्यांनी आजवर अनेकदा मागणी, विनंती, पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला आहे. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळं सरनोबत यांच्यासह कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राष्ट्रपतींकडे केली मागणी

दरम्यान कर्मचाऱ्याची होणारी ससेहोलपट सहन होत नसल्यानं अखेर निवृत्त कर्मचारी राजेंद्र सरनोबत यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. परिवहन विभागाचे मंत्री हे ठाणे जिल्ह्यातलेच असून त्यांच्याच जिल्ह्यातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांवर ही वेळ येत असेल, तर मंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घालावं, अशी अपेक्षा यानंतर व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply