Mumbai Water Crisis News : मुंबईकरांचे टेन्शन वाढलं, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त ५ टक्केच पाणीसाठा

 

Mumbai Water Crisis News  : राज्यात मान्सून  दाखल होऊन बरेच दिवस झाले तरी देखील अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. अशामध्ये आता मुंबईकरांचे टेन्शन आणखी वाढले आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त ५ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट वाढले आहे. आधीच मुंबईमध्ये १० ते १५ टक्के पाणीकपात सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला २ धरणांतील राखीव कोट्यातून पाणीपुरवठा केला जात आहे.

या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त ५ टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना पालिकेकडून आवाहन केले जत आहे. धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्यामुळे मुंबईवर पाणीकपातीची संकट ओढावले आहे.

Pune : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी, येत्या शुक्रवारी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा लक्षात घेता मुंबई महानगर पालिकेने ३० मेपासून ५ टक्के पाणीकपात केली होती. त्यानंतर ५ जूनपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात आली. अशामध्ये मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याची साठवून ठेवत त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासारख्या तलाव आणि धरणांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो. या सर्वच धरण क्षेत्रांमध्ये जून महिना संपत आला तरी देखील जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. जोपर्यंत या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत नाही तोपर्यंत पाणीसाठा वाढणार नाही. धरणांमधील पाणीसाठा वाढल्यानंतरच मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होणार आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply