Mumbai Reay Road Fire : मुंबईत अग्रितांडव! रे रोड परिसरातील गोदामाला आग, अग्निशमन दलाचे १० अग्निबंब घटनास्थळी

Mumbai : मुंबईतून आगीची मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईच्या रे रोड परिसरातील गोदामाला आग लागल्याची माहिती मिळत आहे. या गोदामाला आग लागल्याची घटनेने अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील रे रोड परिसरात गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ब्रिटनिया कंपनी शेजारील देवीदयाळ कंपाऊंड येथील तळमजला आणि एकमजली गोदामाला आग लागली. या गोदामाला सकाळी १०.१५ च्या सुमारास ही आग लागली. सुरुवातीला आग छोटी होती, मात्र काही मिनिटानंतर या आगीचा भडका उडाला

Pune Accident : बसच्या चाकामध्ये पाय अडकून महिलेचा मृत्यू, पुण्यामधील धक्कादायक घटना

या भीषणआगीच्या धुराचे लोट हवेत दूरवर पसरले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धााव घेतली. अग्निशमन दलाचे १० अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांसोबत स्थानिक पोलीस, आरोग्य क्षेत्रातील कर्माचारी आदी यंत्रणेतील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु केले.

या गोदामाला आग नेमकी कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान या या आगीच्या कारणाचा तपास करत आहेत. या आगीत गोदामाचे नुकसान झालेले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply