Mumbai Rain : ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

Mumbai Rain : ठाण्यात रविवारी रात्रीपासून ते सोमवारी संध्याकाळपर्यंत पाऊसाने दमदार हजेरी लावलीय. धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे ठाणेकरांची, चाकरमान्यांची, प्रशासनाची दाणदाण उडवून दिली. मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेला फटका बसलाय. ठाण्याहून कल्याणचा दिशेने जाणाऱ्या ट्रेन धिम्या गतीने सुरू आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. मुंबई ते पुणेपर्यंतच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे ठाण्यात डझनभर झाडे कोसळल्याची घटना घडल्यात. रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ठाण्यात २४ तासात १२७ मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. तर सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपासून ते संध्याकाळी साडे वाजेपर्यंत २५.६५ मिमी पाऊसाची नोंद करीत एकूण पाऊस हा १५० मिमी पार झाल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलीय.

Konkan Rain Update : कोकणासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी

रविवारी सकाळ ते सोमवारी संध्याकाळपर्यंतच्या २४ तासात पडलेल्या मुसळधार पावसाने रेल्वे सेवा ठप्प झालीय. रेल्वे मार्गात पाणी तुंबल्याने लोकल तसेच अनेक लांब पल्याच्या गाड्या खोळंबल्या. परिणामी, ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाश्यांची झुंबड उडाली. रेल्वे ठप्प झाल्याने रिक्षा - टॅक्सी तसेच खासगी वाहनांकडून प्रवाश्यांची लूट सुरू झाली.

रविवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढलंय. धुवाँधार पावसामुळे ठाण्यातील रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक मंदावली. शहरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याने वाहने चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - अहमदाबाद रोड,मुंबई- नाशिक महामार्ग तसेच घोडबंदर रोड आणि नौपाडा, सिव्हील रुग्णालय परीसरात वाहतूक कोंडी झाली होती.

तर मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. मध्यरेल्वे मार्गावरील भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने ठाणेहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहे. काही काळानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर काही अंशी रेल्वे सेवा सुरू झालीय. परंतु रेल्वे गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावताहेत.

तर ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलही अर्धा ते पाऊण तास उशिराने धावताहेत. कर्जत कसाराहून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकल गाड्या ठाणेपुढे जात नव्हत्या. तर अनेक लांब पल्याच्या गाड्याही खोळंबल्यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. मुंबई येथे होत असलेल्या पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे रेल्वे स्थाकाजवळ थांबविण्यात आल्यात. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर पाणी साचले आहे त्यामुळे प्रवाश्यांना ट्रेन पकडण्यासाठी त्रास होत आहे.

मुंबई विभागात विविध ठिकाणी पाणी साचले आहे, त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीय. या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलंय.

या रेल्वेगाड्या रद्द

1007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ

12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ

11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ

12123 छत्रपती शिवाजी महाराज – पुणे डेक्कन क्वीन जेसीओ

12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ

11008 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ

12128 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ

11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ

12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन जेसीओ

12110 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply